संगमनेर पालिका समित्यांच्या सभापतीपदी महिलाराज

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील पालिकेच्या सन 2020-2021 वर्षाकरिता विविध विषयांच्या समित्यांच्या सभापतीपदाची निवड नुकतीच करण्यात आली.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, पक्षप्रतोद विश्वास मुर्तडक, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पुंड, नगरसेविका सोनाली शिंदे, रूपाली औटी, सुनंदा दिघे, बाळासाहेब पवार, शबाना बेपारी, आरिफ देशमुख, नूरमोहम्मद शेख, किशोर पवार, सुहासिनी गुंजाळ, मनीषा भळगट, नितीन अभंग, प्रियंका भरीतकर, राजेंद्र वाकचौरे, मालती डाके, शैलेश कलंत्री, नसीमबानो पठाण, हिरालाल पगडाल, वृषाली भडांगे आणि मुख्याधिकारी सचिन बांगर उपस्थित होते. यावेळी सुनंदा दिघे यांची सार्वजनिक बांधकाम समिती, मनीषा भळगट यांची स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती, मालती डाके यांची पाणी पुरवठा समिती, शबाना बेपारी यांची महिला व बालकल्याण समिती, सुहासिनी गुंजाळ यांची महिला व बालकल्याण उपसभापती, वृषाली भडांगे यांची शिक्षण समिती, कुंदन लहामगे यांची नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी आणि स्थायी समिती सदस्यपदी दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, नसीमबानो पठाण यांची निवड झाली आहे.

