निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारल्याने 123 जणांना नोटिसा श्रीरामपूरची मतदान यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी पाच आणि एक शिपाई असे एकूण 850 निवडणूक कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र, प्रथम टप्पयातील प्रशिक्षणाला 15 केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 50 तर 31 शिपाई अशा 123 निवडणूक कर्मचार्‍यांनी दांडी मारल्याने त्यांना नोटिसा पाठविल्या आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी श्रीरामपूरची मतदान यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्यासाठी प्रत्यक्षपणे दररोज तहसील कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे. 15 जानेवारी रोजी तालुक्यातील 130 मतदान केंद्रावर मतदान होत असून, त्यासाठी येथील खासदार गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी निवडणूक कर्मचारी वर्गाला मार्गदर्शक सूचना दिल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार दीपक गोवर्धन, अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र भगत, पुरुषोत्तम चौधरी, श्रीधर बेलसरे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, बेलापूर बुद्रुक येथील ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असून, सुमारे 14 हजारहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच टाकळीभान, बेलापूर खुर्द, पढेगाव, निपाणी वडगाव, वडाळा महादेव परिसरात प्रचाराला वेग आला आहे.

Visits: 160 Today: 1 Total: 2055967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *