अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास तेरा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा


नायक वृत्तसेवा, नेवासा
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणार्‍या तरुणास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 13 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. मुक्तार रज्जाक शेख (वय 25, रा.महालक्ष्मी हिवरे, ता.नेवासा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सन 2018 मध्ये इयत्ता दहावीत शिकणार्‍या मुलीला आरोपी मुक्तार शेख याने लग्नाच्या आमिषाने पळवून नेले. पैठण, जालना, पुणे, रायपूर, छत्तीसगड, पिंपरी खालसा, कृष्णपुरी तांडा आदी ठिकाणी त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हंटले होते. पोलीस व पीडितेच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता रायपूर येथे दोघे आढळून आले. या प्रकरणी सोनई पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी शेख यास 13 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.देवा काळे यांनी काम पाहिले.

Visits: 170 Today: 1 Total: 1956653

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *