नेवाशात नरहरी महाराज मंदिराचे कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्रिदिनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन; पहिल्या दिवशी मिरवणूक
नायक वृत्तसेवा, नेवासा
श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावर असलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने संत तुकाराम महाराज मंदिर ते संत नरहरी महाराज मंदिर अशी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
4 ते 6 जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता.4) मिरवणुकीनंतर मंदिर प्रांगणात वेदमंत्राच्या जयघोष करत ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत गणेश पूजन, मातृका विधी, नवग्रह पूजन कार्यक्रम झाला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य पांडुरंग जोशी, अशोकग जोशी, राक्षसभुवन येथील समर्थ घेवारे, सचिन रोहे, सुशील रत्नपारखी यांनी केले.
मंगळवारी (ता.5) श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता संत नरहरी महाराजांच्या नवीन मूर्तीचे पूजन होणार असून बुधवार (ता.6) उद्धव महाराज मंडलिक व संतभमहंत मंडळींच्या उपस्थितीत कलशारोहण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने होणार्या धार्मिक कार्यक्रमासह दर्शन व प्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत नरहरी महाराज मंदिर देवस्थान अध्यक्ष व विश्वस्त मंडळींसह नेवासा तालुक्यातील सुवर्णकार समाज बांधवांनी केले आहे.