मारुती सुझुकीच्या सुपर कॅरीने गाठला चार वर्षांचा टप्पा
नायक वृत्तसेवा, नगर
मारुती सुझुकीच्या विश्वास आणि भागीदारीच्या बळावर मारुती सुझुकीच्या सुपर कॅरीने आपला चार वर्षांचा टप्पा गाठला आहे. मारुती सुझुकीने 2016 मध्ये सुपर कॅरी या आपल्या पहिल्यावहिल्या व्यावसायिक वाहनासह व्यावसायिक विभागात प्रवेश केला. या दमदार मिनी ट्रकने ग्राहकांच्या बहुविध व्यावसायिक गरजा आणि विविध वैशिष्ट्यांनुसार 70 हजारांहून अधिक ग्राहकांना वैयक्तिक स्वरुपाचा अनुभव देत सक्षम केले आहे.
या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (मार्केटिंग अॅण्ड सेल्स) कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, भारतातील महत्त्वाकांक्षी मिनी ट्रक ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या सुपर कॅरीने नेहमीच ही खातरजमा केली की त्यातील मालाचा फार भार वाटणार नाही. सुपर कॅरी पेट्रोल ट्रकचा 75 टक्के बाजारवाटा आहे. दमदार 1196 सीसी, 4 सिलेंडर इंजिनासह बीएस-6 पेट्रोल प्रकार असलेला हा पहिला एसीव्ही मिनी ट्रक सादर करण्यात आला आहे. चार अप्रतिम वर्षे साजरी करताना आम्हांला फार अभिमान वाटतो की इतक्या कमी काळात सुपर कॅरीने स्वत:चे एक आगळे स्थान निर्माण केले आणि लाईट कमर्शिअल व्हेईकल बाजारपेठेत हा दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक विकला जाणारा मिनी ट्रक आहे. मारुती सुझुकीने 2016 मध्ये सुपर कॅरी मिनी ट्रक सादर केला. त्यानंतर 2017 मध्ये सुपर कॅरीचा एस-सीएनजी प्रकार बाजारात आला. बीएस-6 समर्थित एस-सीएनजी प्रकार हा कंपनीच्या मिशन ग्रीन मिलियन या 2020 मध्ये सादर झालेल्या मोहिमेला समानुपाती आहे. सुपर कॅरी एस-सीएनजी प्रकारात अनोखे बाय-फ्युअल म्हणजेच दोन इंधनांवर चालणारे इंजिन आहे. यातील पाच लीटरची टाकी आपात्कालीन स्थितीसाठी इंधनाच्या बॅकअपचीही सुविधा देते. 320 व्यावसायिक आऊटलेट्सच्या माध्यमातून 235 शहरांमध्ये विकल्या जाणार्या सुपर कॅरीने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 15 टक्के आणि आर्थिक वर्ष 2020 मध्ये आजवर 20 टक्के बाजारवाटा नोंदवला आहे. या विभागातील सर्वोत्कृष्ट शक्ती, इंधनक्षमता, सहजसोपी देखभाल, आरामदायीपणा आणि अधिक माल वाहण्याची क्षमता अशा वैशिष्ट्यांना सुपर कॅरी मालकांनी पसंती दिली आहे. या गुणांमुळे त्यांच्या नफ्यातही वृद्धी होते. ऑल-इन-वन पॅकेज देण्याच्या कल्पनेसह सुपर कॅरी 4 वर्षांच्या भरभराटीचा हा वारसा यापुढेही जपणार आहे.