चांदवड येथून आणलेल्या ज्योतीची झरेकाठीत मिरवणूक

नायक वृत्तसेवा, झरेकाठी
श्री क्षेत्र चांदवड रेणुका माता येथून आणलेल्या ज्योतीची संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावातून ग्रामस्थांच्या उपस्थितीत डीजेच्या दणदणाटात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील लक्ष्मी माता तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते देवीची ज्योत आणण्यासाठी चांदवड येथे रेणुका माता देवीकडे रवाना झाले होते. हे तरुण पायी चालत देवीची ज्योत घेऊन झरेकाठीच्या कॅनॉल जवळ आल्यावर गावकऱ्यांनी डीजेच्या दणदणाटात या ज्योतीचे स्वागत करत गावातून मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिलांनी ज्योतीची विधीवत पूजा करून ज्योती मध्ये तेल टाकून दर्शन घेतले. भर पावसात निघालेल्या या मिरवणुकीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी ज्योत आणण्यासाठी गेलेले तरुण अनिल बर्डे, सुरेश बर्डे, वाल्मीक शिंदे, सोमनाथ डोळे, संदीप बर्डे, शरद माळी, अशोक माळी, गोकुळ माळी, रवींद्र बर्डे, सचिन बर्डे, किरण शिंदे, विकास शिंदे, भारत शिंदे, गोरख शिंदे, छबु शिंदे, अजय मोरे, शंकर माळी, नवनाथ बर्डे, सिद्धार्थ निकम, मनोज शिंदे, अमोल शिंदे, ईश्वर शिंदे, दिलीप माळी, राहुल पवार, बाळू पवार, संतोष मोरे, काळू मोरे, महेंद्र शिंदे, कार्तिक बर्डे, किरण पवार, श्याम पवार, सचिन पवार आदींचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

Visits: 228 Today: 5 Total: 1104341
