दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी – डाके

संगमनेर :

जवळपास १७-१८ वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारा डाके परिवार आज अशा परिस्थितीत सापडल्याने आम्हाला खेद वाटतो, परंतु जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका स्वामी डाके यांनी व्यक्त केली.

संगमनेर शहरातील प्रसिद्ध वेदांत वाईन्स शॉप वर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी डाके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध विक्रीविरोधात केलेल्या कारवाईबाबत बोलताना स्वामी डाके यांनी सांगितले की, एका दैनिकात वेदांत वाईन शॉपवरून खोके विक्री व अल्पवयीनांना मद्य विक्री होत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती; मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. वेदांत वाईनमध्ये फक्त वैध परवाना धारकांनाच विक्री केली जाते, परंतु काहींना एक दिवसाचा, काहींना एक वर्षाचा, तर काहींना लाइफटाईम परवाना असतो. अल्पवयीन मुलांना विक्री करणे हे आम्ही कधीच करत नाही. त्यांनी असा संशयही व्यक्त केला की हा प्रकार व्यापारी वर्गातील प्रतिस्पर्ध्यांचे षडयंत्र असावे. गुन्हे शाखेने जप्त केलेला मुद्देमाल फक्त २४ बॉटल एका ठिकाणी आणि ३४ बॉटल दुसऱ्या ठिकाणी सापडला असून तो पूर्ण बॉक्स नसून दोन-तीन लोकांच्या माध्यमातून गोळा करून एकत्रित केलेला मद्यसाठा असू शकतो. सत्य लपवता येत नाही, आमच्यावर आरोप झाले तरी सत्य आमच्या बाजूने उभे राहील असे ते म्हणाले.

Visits: 103 Today: 1 Total: 1916828

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *