डिझेल व पेट्रोल दरवाढीचा नेवासा शिवसेनेकडून निषेध तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दर कमी करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
केंद्र सरकारने केलेल्या डिझेल व पेट्रोल दरवाढीचा नेवासा तालुका शिवसेनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात डिझेल व पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी शिवसैनिकांच्यावतीने करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे डिझेल व पेट्रोलची भरमसाठ महागाई करण्यात आली आहे, यामुळे शेतकर्‍यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून ही दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारमध्ये सामील असणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांचे आंदोलन चिनी व पाकिस्तानी लोकांनी पेटवलेले आंदोलन आहे असे वक्तव्य केले होते. त्याचाही निवेदनातून निषेध करण्यात आला आहे.

याप्रसंगी बोलताना जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके म्हणाले, नेवासे ही माऊलींची भूमी असल्याने आम्ही रास्ता रोको सारखे आंदोलन न करता केंद्र सरकारने केलेल्या डिझेल व पेट्रोल दरवाढीचा निषेध करत आहोत. तसेच केंद्रीय मंत्री दानवे यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करत आहोत. यावेळी तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, अंबादास लष्करे, गोरक्षनाथ घुले, उप तालुकाप्रमुख मुन्ना चक्रनारायण, नारायण लष्करे, पंकज लंभाते, रामानंद मुंगसे, सारंग कोलते, राजेंद्र येळवंडे, अनिल जाधव, सोहेल सय्यद, अली शेख, अमोल खाटीक, मालोजीराव गटकळ, विलास गरुड, इलियास अत्तार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Visits: 94 Today: 2 Total: 1103500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *