मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाची जोरदार हजेरी

मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाची जोरदार हजेरी
धरणातून पुन्हा दोन हजार क्युसेकने अकरा मोर्‍यांद्वारे पाणी सोडले
नायक वृत्तसेवा, राहुरी
दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर गुरुवारी (ता.15) पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून 2000 क्युसेकने 11 मोर्‍यांद्वारे जायकवाडीकडे झेपावले आहे.


यंदा वरुणराजाचा मूड काही औरच असल्याने धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात जोरदार बरसात करत आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रावरही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. मुळा धरण शंभर टक्के भरले आहे. कोतूळ येथून पाण्याची आवक पूर्णपणे बंद आहे. तर पारनेर भागातून दोन हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. कोतूळ येथे आत्तापर्यंत 862 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुळानगर येथे 1030 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मुळा धरणात यंदाच्या पावसाळ्यात 35,540 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी आले आहे. त्यापैकी 14000 टीएमसी पाणी जायकवाडीला गेले आहे. डाव्या कालव्यातून 200 दशलक्ष घनफूट इतके पाणी वाहिले. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून 250 क्युसेकने पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तर डावा कालवा बंद आहे.

लाभक्षेत्रातील पाण्याची आकडेवारी…
कोतूळ 862 मिलीमीटर, मुळानगर 1030 मिलीमीटर, राहुरी 1026 मिलीमीटर, वांबोरी 986 मिलीमीटर, घोडेगाव 1105 मिलीमीटर, सोनई 1132 मिलीमीटर, नेवासा 1182 मिलीमीटर, वडाळा 1264 मिलीमीटर, खडका 860 मिलीमीटर.
– अण्णासाहेब आंधळे (अभियंता, मुळा धरण)

Visits: 163 Today: 1 Total: 1880032

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *