अकोले नगरपंचायतच्या प्रशासकपदी डॉ.मंगरूळे

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायतची मुदत बुधवारी (ता.25) संपल्याने नगरपंचायतवर प्रशासक राज सुरू झाले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरूळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोले नगरपंचायतचा सन 2015-2020चा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यकाल बुधवारी (ता.25) संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी कारभार हाती घेईपर्यंत उपविभागीय अधिकारी डॉ.मंगरूळे हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन प्राथमिक प्रभाग व आरक्षण सोडतही जाहीर झालेली आहे. यावर हरकत घेण्याची मुदत बुधवारी संपलेली असून, 24 डिसेंबर, 2020 रोजी अंतिम प्रभाग व आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. यानंतर सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्चच्या मध्यापर्यंत होणे अपेक्षित आहे. एकूण 17 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातील इच्छुकांनी धावपळ सुरू केली आहे.

Visits: 195 Today: 1 Total: 1112512

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *