इंदोरीकर खटला; सरकारी वकिलांच्या नेमणुकीची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या प्रकरणाला आज (बुधवार ता.25) नवीन मिळाले. या प्रकरणाच्या सुनावणी आधी अचानक सरकारी वकिलांनी माघार घेतल्यामुळे गोंधळ उडाला. यामुळे पुढील सुनावणी पूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करण्याची मागणी ‘अंनिस’च्या अॅड.रंजना गवांदे यांनी केली आहे.
इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आज संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, अचानक सुनावणीच्या काही तासांआधीच सरकारी वकिलांनी माघार घेतली. सरकारी वकिलांनीच माघार घेतल्यामुळे आजची सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही बाजुंनी युक्तिवाद केला जाणार होता. परंतु, सरकारी वकिलांनी अचानक खटल्यातून माघार घेतली. आता पुढील सुनावणीपूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी ‘अंनिस’च्या अॅड.रंजना गवांदे यांनी केली.