दिवाळीच्या खरेदीने दिला संगमनेर तालुक्याला कोविड धक्का! मंगळवारी आढळलेल्या रुग्णांनी तालुक्याची रुग्णसंख्या पोहोचवली पाच हजारांच्या पार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुट्ट्यांचा परिणाम म्हणून दोन दिवस मंदावलेली कोविड रुग्णसंख्या मंगळवारी पुन्हा उसळली. गेल्या तब्बल दीड महिन्यांपासून ग्रामीण रुग्णसंख्येत सातत्य असतांना शहरी रुग्णसंख्या कमी होत असल्याचे निरीक्षण होते. मात्र दिवाळीच्या गर्दीने ते पार कोलमडून गेले असून मंगळवारच्या अहवालातून शहरातील तब्बल 22 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यात ग्रामीणभागातील 32 रुग्णांची नव्याने भर पडल्याने संगमनेर तालुक्याने बाधितांचे पन्नासावे शतकही ओलांडले असून रुग्णसंख्या 5 हजार 8 वर पोहोचली आहे. अर्थात आजच्या स्थितीत तालुक्यात केवळ तीनशे रुग्ण सक्रीय संक्रमित असून 4 हजार 664 रुग्णांनी यापूर्वीच उपचार पूर्ण केले आहेत तर 43 जणांचा बळीही गेला आहे.

दिवाळीनंतर राज्यात कोविडची दुसरी लाट आली असून अनेक शहरांमधील रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. संगमनेरकरांनीही दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. त्याचे दुष्परिणाम आता समोर यायला सुरुवात झाली असून मंगळवारी एकूण 54 जणांचे वाढीव अहवाल प्राप्त झाले. या अहवालातून शहरातील काही व्यापार्‍यांनाही कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढील काळात शहरासह तालुक्यातील संक्रमणाची गती कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील मेहेरमळा भागातील 24 वर्षीय तरुण, इंदिरानगरमधील 55, 36 व 34 वर्षीय महिलेसह 38 व 30 वर्षीरू तरुण, पंपींग स्टेशनजवळील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अभिनव नगरमधील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 27 वर्षीय महिला, अशोक चौकातील 48, 20 व 19 वर्षीय महिला, चैतन्य नगरमधील 28 वर्षीय तरुण, ओमशांती नगरमधील 50 वर्षीय महिला, बाजारपेठेतील 51 वर्षीय महिला, समर्थनगरमधील 40 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 49 वर्षीय महिला, जनता नगरमधील 49 वर्षीय इसम, विद्यानगरमधील 25 वर्षीय तरुण व केवळ संगमनेर असा पत्ता दिलेल्या 55 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

याशिवाय ग्रामीणभागातील 32 जणांचे अहवालही मंगळवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात पेमगिरी येथील 35 वर्षीय तरुण, सावरगाव घुले येथील 75 वर्षीय महिला, गुंजाळवाडी शिवारातील शहरालगतच्या बटवाल मळा येथील 42 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 39 वर्षीय महिला, शिवारातील गोल्डनसिटी येथील 51 वर्षीय इसमासह 17 वर्षीय तरुण, रहाणे मळा येथील 45 वर्षीय तरुण, चिखलीतील 28 वर्षीय तरुण, झोळे येथील 30 वर्षीय तरुण, निमजमधील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खंदरमाळवाडी येथील 22 महिला, धांदरफळ बु. येथील 29 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 60 व 20 वर्षीय महिलेसह 31 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 50 वर्षीय इसम, आश्वी बु. 43 व 32 वर्षीय तरुणासह 10 वर्षीय बालक, निमगाव जाळी येथील 48 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला, प्रतापपूर 21 वर्षीय महिला, जोर्वे येथील 35 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्दमधील 75 वर्षीय महिला, शेडगावमधील 46 वर्षीय इसम व पिंपळगाव देपा मधील 48 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी तालुक्याच्या रुग्णसंख्येत 54 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे पन्नासावे शतक ओलांडून 5 हजार 8 रुग्णसंख्या गाठली आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 117920

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *