‘अन्नपूर्णा भोजनालय आणि ए. एस. प्रॉपर्टीज’चा दिमाखात शुभारंभ
‘अन्नपूर्णा भोजनालय आणि ए. एस. प्रॉपर्टीज’चा दिमाखात शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील बसस्थानकातील शॉपिंग सेंटरमध्ये दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘अन्नपूर्णा भोजनालय आणि ए. एस. प्रॉपर्टीज’ या दोन दालनांचा मोठ्या दिमाखात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

या शुभारंभ प्रसंगी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रा.एस.झेड.देशमुख, कारखान्याचे माजी अध्यक्ष माधव कानवडे, अरुण हिरे, नितीन अभंग, प्रमिला अभंग, ज्ञानेश्वर काजळे, किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. अन्नपूर्णा भोजनालयाच्या माध्यमातून संगमनेकरांना स्वादिष्ट आणि रुचकर शुद्ध शाकाहरी जेवण अगदी माफक दरात मिळणार आहे. तर ए. एस. प्रॉपर्टीजमधून प्लॉट, जागा, बंगले खरेदी-विक्री कामे विश्वासाने होणार असल्याचे संचालकांनी सांगितले. मान्यवरांचे स्वागत करुन सत्कार संचालक सुनील उदावंत, संजय उदावंत, सचिन चिंतामणी, रवींद्र येंधे, अशोक उदावंत आणि रामनाथ अभंग यांनी केला. शेवटी अशोक उदावंत यांनी आभार मानले.

