प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध ः आ.डॉ.लहामटे
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध ः आ.डॉ.लहामटे
भंडारदरा व निळवंडे धरणातील पाण्याचे शासकीय जलपूजन
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात असणार्या धरणांतील पाण्यावर पहिला हक्क धरणग्रस्त व स्थानिक आदिवासींचा असून भंडारदरा, निळवंडे व घाटघर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास आमदार डॉ.किरण लहामटे यांनी व्यक्त केला.

भंडारदरा, निळवंडे धरणातील पाण्याचे शासकीय जलपूजन शुक्रवारी (ता.21) आमदार लहामटे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार लहामटे म्हणाले, भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील आदिवासींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रथम निळवंडे धरणातील पाणी आवर्तनासाठी सोडण्याचे धोरण अवलंबविण्यात येईल, असे सांगितले. ज्येष्ठ नेते अशोक भांगरे म्हणाले, निळवंडे धरणाच्या निमिर्तीपासून आम्ही संघर्ष करत असून सन 2000 साली गोटाफेक आंदोलन केल्यामुळे दहा दिवस येरवडा जेलमध्ये गेलो होतो. राज्यातील सत्तेचा उपयोग तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे, अमित भांगरे, सुरेश गडाख, मीनानाथ पांडे, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, युवक तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, राजेंद्र कुमकर, महेश तिकांडे, अमित नाईकवाडी, प्रा.चंद्रभान नवले, स्वाती शेणकर, पुष्पा सावंत, जयश्री सावंत, पाटीलबा सावंत, विनोद हांडे, संतोष नाईकवाडी, संदीप शेणकर, कोंडाजी ढोन्नर, मारूती मेंगाळ, संदीप डगळे, सुभाष मालुंजकर, कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर व शाखाधिकारी अभिजीत देशमुख आदी उपस्थित होते.

