श्रीरामपूरमध्ये पोलिसांचा लॉजवर छापा; पीडित महिलांची सुटका

श्रीरामपूरमध्ये पोलिसांचा लॉजवर छापा; पीडित महिलांची सुटका
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील शहर पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळच असलेल्या एका लॉजवर नुकताच छापा टाकला असता चितळी येथील एकजण महिलांशी अनैतिक सबंध ठेवण्यास भाग पाडत असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडून 3 हजार रुपये रोख, निरोधची पाकिटे आणि 37 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहे. दरम्यान, अनैतिकपणे वेश्या व्यवसाय करणार्‍या पीडित महिलांना सोडून देण्यात आले.

श्रीरामपूर शहरातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आयुष नोपाणी यांना मिळाली असता त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसूद पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.एस.आरोळे, एस.जी.औटी, पोलीस कॉन्स्टेबल ए.बी.पठाण, एन.एस.चव्हाण व महिला पोलीस नाईक जे.एस.घाडगे, अश्विनी पवार, पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर यांच्या पथकाने शहरातील शिवाजी पंचशील लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवून दोन पंचांसमक्ष छापा मारला असता त्याठिकाणी गणेश विश्वनाथ खैरनार (रा. चितळी, ता.राहाता) हा त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पैशांची देवाण-घेवाण करुन महिलांना अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असताना 3 हजार रुपये रोख, निरोधचे पाकिटे आणि 37 हजार रुपये किंमतीचे मोबाईलसह मिळून आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गणेश खैरनार याच्याविरोधात भादंवि कलम 370 सह स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Visits: 118 Today: 2 Total: 1424261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *