करुले येथील शेतकर्याची आत्महत्या
करुले येथील शेतकर्याची आत्महत्या
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील करुले येथील कर्जबाजारी शेतकर्याने बुधवारी (ता.4) पहाटे घरातून बाहेर पडून स्वतःच्या विहिरीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दिलीप अर्जुन कोल्हे (वय 41) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. मयत शेतकरी कोल्हे यांच्यावर फायनान्स कर्ज, नापिक शेती आणि दूधधंद्यातील तोटा यामुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, आई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर मदत कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांच्यासह अन्य तिघांनी सहभाग नोंदवला.

Visits: 141 Today: 3 Total: 1109187
