श्रीरामपूरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात दुर्गंधी

श्रीरामपूरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात दुर्गंधी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळील स्वच्छता गृहाच्या मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून नव्याने झालेल्या स्वच्छता गृहाचे कामही नित्कृष्ट दर्जाचे झाले आहे. याची चौकशी होऊन स्वच्छता गृहाची दुर्गंधी दूर करण्यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण यांनी आज नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन केली आहे.


स्वच्छता गृहाच्या दुर्गंधीमुळे ग्राहकही या भागात फिरकत नाही अशी तक्रार या भागातील व्यावसायिकांनी केली असल्याने भारतीय लहुजी सेनेच्यावतीने याबाबत निवेदन देण्यात आले आहे. नागरिकांच्या या समस्येबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदनावर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण, राजेंद्र त्रिभुवन, अहमद नाशिर शेख, भाई शेख, जिल्हाप्रमुख यांच्यासह पदाधिकारी व व्यावसायिकांच्या सह्या आहेत.

Visits: 120 Today: 1 Total: 1113344

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *