पती-पत्नीला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

पती-पत्नीला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील केळी-रूम्हणवाडी येथील महिलेचा विनयभंग करुन तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अकोले पोलिसांत चौघांवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


केळी-रूम्हणवाडी येथील फिर्यादी महिला गुरुवारी (ता.20) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घरासमोर बसलेली असताना तिच्या भावकीतील निवृत्ती दगडू बिन्नर, सुनीता निवृत्ती बिन्नर, अश्विनी निवृत्ती बिन्नर (सर्व रा.केळी-रूम्हणवाडी) व किसन त्र्यंबक ढोन्नर (ढोन्नरवाडी) हे चौघेजण मागील भांडणाचा राग धरून महिलेजवळ आले. त्यातील किसन ढोन्नर याने फिर्यादी महिलेचा हात धरून छाती दाबली. तर निवृत्ती बिन्नर याने लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले. दरम्यान, वाद सोडविण्यासाठी पती आले असता त्यांना सुनीता व अश्विनी बिन्नर यांनी काठीने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर चौघांनी ‘आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देऊन पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी भादंवि कलम 354, 354 बी., 324, 323, 504, 505 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.व्ही.गोराणे हे करत आहे.

Visits: 145 Today: 1 Total: 1960217

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *