संगमनेर नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहिर !

‘कही खुशी कही गम’; अनेकांना नविन प्रभाग शोधावा लागणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या ३० जागांसाठी आज बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनेक इच्छुकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांचा हिरमोड झाला असून त्यांना आता नविन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या ३० जागापैकी तब्बल १५ जागा आणि नगराध्यक्ष पदाची एक अशा १६ महिला यावेळी सभागृहात दिसतील. त्यामुळे पालिकेवर येत्या काही काळात महिलाराज पहायला मिळणार आहे. प्रभागांच्या आरक्षण सोडतीनंतर सर्वपक्षीय कार्यकत्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पहायला मिळाले.

संगमनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला खुला प्रवर्गासाठी जाहिर झाल्यानंतर नगरपरिषदेच्या १५ प्रभागांसाठी ३० सदस्यांची आरक्षण सोडत बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रांत कार्यालयात जाहिर करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण १०, सर्वसाधारण महिला १०, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४, अनुसूचित जाती १, अनुसूचित जाती महिला १ असे प्रभाग आरक्षण झाले असल्याची माहिती नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी दिली. त्यामुळे आता अनेक दिग्गजांचे पत्ते कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संगमनेर नगरपरिषदेवर गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राज सुरू असून लवकरच हे प्रशासकीय राज संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिका यांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहिर केले आणि यामध्ये संगमनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला खुला प्रवर्गासाठी जाहिर झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या कार्यालयात नगरपरिषदेच्या हद्दीतील १५ प्रभागांसाठी ३० सदस्यांची आरक्षण सोडत जाहिर झाली. यामध्ये प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक आहेत. यामध्ये प्रभाग एकसाठी प्रभाग १ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १ च सर्वसाधारण, प्रभाग २ अ अनुसूचित जाती, प्रभाग २ व सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ३ व सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ अ सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ च सर्वसाधारण, प्रभाग ५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ५ व सर्वसाधारण, प्रभाग ६ अ सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ व सर्वसाधारण, प्रभाग ७ अ सर्वसाधारण महिला, मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ८ ब सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, प्रभाग १० अ सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ११ व प्रभाग १२ व सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ सर्वसाधारण महिला, प्रभाग प्रभाग ७ व सर्वसाधारण, प्रभाग ८ अ नागरिकांचा प्रभाग ९ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ९ व महिला, प्रभाग १० च सर्वसाधारण, प्रभाग ११ अ सर्वसाधारण, प्रभाग १२ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, अ अनुसूचित जाती महिला, प्रभाग १३ व सर्वसाधारण, प्रभाग १४ अ सर्वसाधारण महिला, १४ ब सर्वसाधारण, प्रभाग १५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग १५ व सर्वसाधारण महिला. असे प्रभाग नुसार आरक्षण जाहिर झाले आहे.

