पोलिसांच्या कामात अडथळा, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेरः
संगमनेर शहर पोलिस पेट्रोलिंग करत असतांना साईनगर परिसरातील गजानन महाराज मंदिर येथील सार्वजनिक ठिकाणी आपआपसात बाचाबाची करणाऱ्यांना पोलिसानी समजावून सांगून देखील त्यांनी आपआपसात दंगल केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी चार निष्पन्न आरोपीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील साईनगर परिसरातील गजानन महाराज मंदीर येथील सार्वजनिक ठिकाणी विजय ओच्छावलाल सोनी (वय ५८, रा.घोडेकर मळा, संगमनेर), गोकुळ ज्ञानेश्वर रणमाळे (वय ३५, रा. चव्हाणपुरा, साईनगर, संगमनेर), अनिकेत गजानन मंडलिक (वय- २२, रा. माळीवाडा, गल्ली नं. ३, संगमनेर), राहुल भारत सोनवणे (रा. भराड वस्ती, अकोले नाका, संगमनेर) आणि इतर दोघे आपआपसात बाचाबाची करुन भांडत होते. त्यावेळी शहर पोलिसांचे पेट्रोलिंग करणारे पथक तेथे गेले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी त्यांना समजावून सांगून सुद्धा त्यांनी त्यांचे न ऐकता दंगल केली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल विशाल रामदार कर्पे हे करत असलेल्या सरकारी कामात अटकाव केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विशाल कर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी निष्पन्न चार आरोपीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून बातील चौघांना गजाआड केले आहे.

