महिलेला मारहाण करत दुचाकीची तोडफोड !

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घरासमोर उभ्या असलेल्या ४६ वर्षीय महिलेला तीन जणांनी हाताने व लाकडाने पाठीवर, हातावर व माडीवर मारून जखमी केल्याची घटना शहरालगत असलेल्या घुलेवाडी येथील माऊली कॉलनी येथे सोमवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यातील आरोपींनी घराजवळ असलेल्या दुचाकीचीही तोडफोड केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिता हरी येवले (वयः ४६, रा. मालदाड रोड, घुलेवाडी माऊली कॉलनी, संगमनेर) ह्या सोमवारी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या घरासमोर असताना राजेंद्र शिवाजी नेहे, मनिषा राजेंद्र नेहे, अमित कुटे (पुर्ण नाव माहित नाही, तिघे रा. पेटीट सर्कल जवळ, संगमनेर) हे सुनिता येवले राहत असणाऱ्या घरासमोर गेले व त्यांना म्हणाले की, तुमचा मुलगा कोठे आहे असे विचारले असता येवले त्यांना म्हणाल्या, मुलगा शंकर कामाला गेला. असे त्या म्हणाल्या असता अमित कुटे याने येवले यांचा मोबाईल घेवुन त्यांचे पती हरी यांना फोन करुन शिवीगाळ केली व मनिषा नेहे हिने सुनिता येवले यांना हाताचे चापटीने मारहाण केली. तसेच अमित कुटे याने येवले यांच्या घरासमोर पडलेले लाकडी लाकूड त्यांच्या पाठीवर, हातावर व मांडीवर मारुन जखमी केले. तसेच त्यांचा मोबाईल व घरासमोर लावलेली दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी सुनिता येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील तिघां जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

