कर्ज पुरवठा करून व्यावसायिकांना प्रोत्साहन द्या : डॉ.तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तत्पर सुविधा देण्याबरोबरच चांगल्या कर्जदारांना कर्जपुरवठा व छोट्या कर्जदारांना कर्ज देऊन त्यांच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्याचे काम करावे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आ.डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणारी आणि संगमनेर तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या येथील संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी माजी आ. डॉ. तांबे बोलत होते. यावेळी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सुधाकर जोशी, सी.ए. बापुसाहेब टाक, यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल व पारदर्शक कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले.

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात संस्थेला ३ कोटी २ लाख इतका नफा झाला आहे. या पारदर्शक कारभारामुळे संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली. संस्थेकडे १३७ कोटी ४९ लाख इतक्या ठेवी जमा आहेत. भागभांडवल १ कोटी ८४ लाख असून संस्थेने १०७ कोटी ५७ लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेने ५७ कोटी ५८ लाख इतकी गुंतवणूवक केलेली आहे. संस्थेचा राखीव निधी ९ कोटी ७६ लाख व इमारत निधी ९ कोटी १८ लाख आहे. २६ कोटी इतका स्वनिधी संस्थेकडे आहे. संस्थेला स्थापनेपासुन ‘अ’ ऑडीट वर्ग मिळालेला आहे. यावेळी चेअरमन राणीप्रसाद मुंदडा, व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी, डॉ.एन.एस.शेख, विलास दिघे, डॉ. माणिक शेवाळे, सुर्यकांत शिंदे, नानासाहेब वर्पे, दत्तात्रय आरोटे, ॲड. प्रशांत गुंजाळ, सूचित गांधी, सुदीप वाकळे, उमेश बोटकर, श्रीकांत कोकणे, सोमेश्वर दिवटे, सुलभा दिघे, सुनंदा दिघे, अनिल सातपुते, सी.ए. अमित कलंत्री तसेच व्यवस्थापकीय सल्लागार प्रकाश गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. चेअरमन राणीप्रसाद मुंदडा यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक उमेश शिंदे यांनी अहवाल वाचन केले. तर व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पल्लवी कानवडे यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीने व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आ. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे.

Visits: 57 Today: 2 Total: 1109450
