अकोले राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी स्वाती शेणकर तर तालुकाध्यक्षपदी शरद चौधरी


नायक वृत्तसेवा, अकोले
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्त करून तसे संबंधितांना पत्र देण्यात आले.

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीसपदी भीमाशंकर कवडे, जिल्हा संघटकपदी अ‍ॅड. दत्तात्रय निगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष बोटे यांची निवड झाली. उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षपदी अकोल्याच्या स्वाती शेणकर यांची निवड करण्यात आली. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी शरद चौधरी, कार्याध्यक्षपदी ईश्वर वाकचौरे, सचिवपदी प्रशांत धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अकोले तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय आभाळे, कार्याध्यक्षपदी शुभम येलमामे, अकोले शहराध्यक्षपदी विनायक धुमाळ, युवक उपशहराध्यक्षपदी पराग वाडगे यांची नियुक्ती करण्यात आली.

याचबरोबर अकोले तालुका महिला अध्यक्षपदी नीता आवारी, कार्याध्यक्षपदी राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे, उपाध्यक्षपदी उज्वला राऊत, अकोले शहराध्यक्षापदी भीमा रोकडे, तालुका कार्यकारिणी सदस्यपदी अंजली कणाके यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 160 Today: 1 Total: 1108206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *