अगस्ती विद्यालयाने पटकावला पाटणकर स्मृती चषक

नायक वृत्तसेवा, अकोले 
सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक सचिव कै. रा.वि. पाटणकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतरशालेय तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती  विद्यालयाने आपली चुणूक दाखवत पाटणकर स्मृती चषकावर नाव कोरले.
आठवी ते दहावी या मोठ्या गटात विद्यालयाची विद्यार्थीनी मैत्रेयी निलेश सहाणे हिने प्रथम क्रमांक मिळवत फिरता स्मृतीचषक पटकावून अगस्ती विद्यालयाला बहुमान मिळवून दिला. आदिवासी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच महात्मा गांधीजींच्या विचारांचे पाईक म्हणून सर्वोदय मार्फत विविध सामाजिक उपक्रम व आदिवासी बांधवांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी पाटणकर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी संस्थेने त्यांच्या नावाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती व या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे दोन गटात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला.अगस्ती विद्यालयाने दोन्ही गटात सहभाग घेत यश मिळवले. अर्णव सोनवणे, प्रियदर्शनी भवर, साईश्री ढोकरे यांनी स्पर्धेत सहभाग घेत रंगत आणली. तर मोठ्या गटात मैत्रेयी निलेश सहाणे हिने आपला प्रभाव सिद्ध करत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला व त्याचबरोबर मानाचा फिरता कै. रा. वि. पाटणकर स्मृती चषकावर अगस्ती विद्यालयाचे नाव कोरले.
यापूर्वीही विद्यालयाची विविध आंतरशालेय स्पर्धेमध्ये  चमकदार कामगिरी राहिली असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.या यशाबद्दल संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी,  प्राचार्य मंगेश खांबेकर, उपमुख्याध्यापक तात्यासाहेब दौंड, पर्यवेक्षक नंदा गोपाळे,  शालेय व्यवस्थापन समितीचे गिरीष नवले, सचिन शिंदे आदी पदाधिकारी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाकडून अभिनंदन होत आहे.
Visits: 197 Today: 1 Total: 1873438

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *