युवकांची अध्यात्मिक भावना मोठी : डॉ.विखे पाटील 

नायक वृत्तसेवा, राहाता 
आसामच्या गुवाहाटी  येथून तब्बल ३,४०० किलोमीटर अंतर पायी  ज्योत आणणाऱ्या वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचा माजी खासदार डॉ. सुजय  विखे पाटील यांनी एकरूखे येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात गौरव केला. हा पराक्रम अभूतपूर्व असून या उपक्रमागची अध्यात्मिक भावना मोठी असल्याचे या युवकांनी सिद्ध केले  असल्याचे यावेळी सांगितले.
तालुक्यातील एकरूखे  येथे वज्रेश्वरी प्रतिष्ठान आयोजित मशाल पदयात्रेचे आगमन होताच ग्रामस्थ व भाविकांनी उत्साहात स्वागत केले. या वेळी माजी खासदार डॉ. सुजय  विखे पाटील यांनी मनोभावे दर्शन घेऊन पदयात्रेत सहभागी झालेल्या युवकांचा विशेष गौरव केला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ.विखे भाविकांशी संवाद साधत म्हणाले  की, नेते मोठे नसतात, अनेक येतात-जातात परंतु कार्यकर्त्यांच्या जिद्दीमुळेच खरी ओळख निर्माण होते. विखे पाटील कुटुंबाची ओळख टिकून आहे कारण अशा कार्यकर्त्यांचा मजबूत पाया मागे उभा आहे.पदयात्रेचा कठीण प्रवास, दरम्यान आलेल्या अडचणी, मुसळधार पावसाच्या संकटांनंतरही युवकांनी हा पराक्रम साध्य केला याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केले. हा पराक्रम फक्त वज्रेश्वरी मातेसह देवतेच्या कृपेने आणि युवकांच्या चिकाटीने शक्य झाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने या युवकांचा आदर्श घेतला तर अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. विखे पाटील यांनी  पुरामुळे बाधित शेतकऱ्यांचा उल्लेख करत, लवकरच शासनाचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. राजकारणासाठी मत मागणारे अनेक येतात, पण संकटाच्या काळात खऱ्या अर्थाने सोबत उभे राहणे ही विखे पाटील कुटुंबाची परंपरा  असल्याचे सांगितले.
Visits: 63 Today: 2 Total: 1114524

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *