वसुंधरा पायी दिंडीचे नाणीजधामकडे प्रस्थान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक येथील श्रीक्षेत्र उत्तर महाराष्ट्र (नाशिक), येथे वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य स्थापित रामानंद संप्रदाय, उत्तर महाराष्ट्र (नाशिक) उपपीठाहून पायी दिंडीचे २९ सप्टेंबर रोजी प्रस्थान झाले आहे.

या पायी दिंडी मध्ये हजारो भाविक नाशिकपासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या २१ ऑक्टोबर रोजी ५९ वा. वाढदिवस येत आहे. रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नाणीजधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो. त्यादिवशी हि दिडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.
Visits: 75 Today: 6 Total: 1108141
