सांदण आदिवासी चळवळीकडून प्रेरणा घ्या : आ. डॉ.लहामटे

नायक वृत्तसेवा, राजूर
सांदण आदिवासी लोकचळवळीचे सामाजिक व शैक्षणिक कार्य हे संपूर्ण समाजासाठी महत्वाचे व दिशादर्शक आहे. समाजासाठी काम करणार्‍या संस्था, संघटना यांनी सांदण आदिवासी चळवळीकडून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
जागतिक मूळनिवासी दिनानिमित्त सांदण आदिवासी लोकचळवळ महाराष्ट्र यांचे वतीने तालुक्यातील राजुर येथील ॲड.देशमुख महाविद्यालयात आदिवासी लोकजीवन उलगडणार्‍या  विविध विषयांवर केलेले अभ्यासपूर्ण लेखन व त्या लेखनाला उत्तेजन देण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.आ.डॉ. किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली व आय.पी.एस. प्रशांत डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी  अधिव्यिख्याता अरुण भांगरे, डॉ. अशोक धिंदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे आदी उपस्थित होते.
 संशोधन, चिंतन व त्यातुन केलेले उत्कृष्ट लेखन केलेल्या ५० विद्यार्थ्यांचा चळवळीच्या वतीने शॉल, मेडल, प्रमाणपत्र, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पेसा भरती अंतर्गत तलाठी, कृषी सेवक व इतर पदावर भरती झालेल्या आदिवासी कर्मचार्‍याचाही सन्मान करण्यात आला.सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी स्पर्धापरिक्षा व या परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणा म्हणून आपले आई-वडील महत्वाचे असल्याचे सांगताना सातत्यपूर्ण कृतींचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल भवारी, सोपान निर्मळ, धोंडिबा डगळे, भिमा डगळे, ज्ञानेश्वर डगळे, संजय देशमुख, अजय पवार, धनंजय पिचड, विजय कोंडार,अरुण गभाले यांनी परिश्रम घेतले. केले.सांदण आदिवासी लोकचळवळीचे अध्यक्ष डॉ. अरविंद सगभोर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसचांलन सचिव किरण बांडे यांनी तर  आभार अनिल डगळे यांनी मानले.
Visits: 112 Today: 2 Total: 1103746

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *