विद्या निकेतन मध्ये फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्यातील बोटा येथील विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर येथे फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट शपथ घेतली.
या शपथविधी प्रसंगी विद्यार्थ्यांनी समाजाच्या आरोग्यसेवेसाठी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किरण शिंदे, प्रा. रुपाली तांबे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. दिपाली कुरकुटे यांनी केले. तर आभार प्रा. मेघा किरवे यांनी मानले.

Visits: 52 Today: 2 Total: 1108866
