कंटेनर – दुचाकीच्या अपघातात जोर्वेचा तरुण ठार

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर – कोपरगाव रस्त्यावर तालुक्यातील तिगाव परिसरात भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवरुन जात असलेला जोर्वेचा तरूण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अर्जुन सचिन लोणारी असे या अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.

तालुक्यातील जोवे येथील रहिवाशी असणारा तरुण अर्जुन सचिन लोणारी (वय २९) हा आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक (एम. एच. १५ ए. सी. ८८९३) वरून वडगाव पान फाट्चावरून तळेगाव दिघेकडे जात होता. तो तिगाव परिसरात आला असता कंटेनर क्र (एन. एल. ०१ ए. के. २३८८) ने समोरून त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला उपचारासाठी त्वरित संगमनेर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत संदिप श्रीपत इंगळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक अवनिशकुमार लक्ष्मण सिंग (रा. बरहिया बरनलाल, जि. मैनपुरी, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 181 Today: 1 Total: 2166813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *