स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! 

नायक वृत्तसेवा, शेवगाव 
जिल्ह्यातील शेवगाव येथे विक्रीकरता आणलेला ११ किलो ८३ ग्रॅम गांजासह एकुण १३ लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. 
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असतांना,पथकांस गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सतिष सुरेश डोळस (रा.मावळ, पुणे),राकेश सुदाम वाळुंज (रा.मावळ, ता. पुणे), आकाश देविदास जंगम (रा.कामशेत, पुणे),  सतिष कृष्णकुमार बिडलांग (रा.कारला,मावळ,पुणे) हे त्यांच्या कडील काळ्या रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच.१२ जे. झेड १८५४ हिच्या मधून  सुरज आसराजी छाजेड (रा.बालमटाकळी,शेवगांव) याच्या कडुन  गांजा खरेदी करुन विक्री करिता शेवगांव येथुन पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पथकाने पाथर्डी ते शेवगांव जाणारे रोडवरील माळी बाभुळगांव फाटा या ठिकाणी सापळा रचुन  काळे रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. १२ जे झेड १८५४ ताब्यात घेतली.स्कॉर्पीओची झडती घेता सदर गाडीचे पाठीमागील डिकीमध्ये निळ्या रंगाची ट्रॅव्हल बॅग मिळुन आली.
सदर बॅग  दोन मोठ्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला,फुले,बोंडे काड्या संलग्न असलेले कॅनबिस वनस्पतीचे शेंडे (अंमली पदार्थ गांजा) मिळुन आला. याबाबत आरोपी सतिष सुरेश डोळस यांने तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगुन तो नशेसाठी वापरला जातो व सदरचा गांजा सुरज आसराजी छाजेड (रा.बालमटाकळी, शेवगांव,जि.अहिल्यानगर) यांचे कडून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी वरील चौघांना अटक करत त्यांच्याकडून १३ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरज आसराजी छाजेड हा (रा.बालमटाकळी, ता. शेवगाव) हा फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ.बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Visits: 117 Today: 2 Total: 2166471

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *