महायुती सरकारने आद्य क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा दिला : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशासाठी बलिदान देणाऱ्या अनेक क्रांतिकारकांचा दुर्दैवाने इतिहास   झाकण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केला. मात्र त्याला उजाळा देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून झाले असल्याचे  गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
जय मल्हार क्रांती या संघटनेच्यावतीने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आ.अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ढोल-ताशाच्या गजरात बसस्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर  आयोजित  जयंती महोत्सव कार्यक्रमात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आ. खताळ बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूरचे प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग, जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष रोहिदास मदने, नाशिक जिल्हाध्यक्ष मतेश जेडगुले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, शहराध्यक्षा पायल ताजणे,  काशिनाथ पावसे, भारत गवळी, दिलीप रावळ, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कैलास जेडगुले, जिल्हा सचिव भारत गोफणे, दत्तू गोफणे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, युवक अध्यक्ष सागर जेडगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ.खताळ म्हणाले की आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढा दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.राजे उमाजी नाईकांनी फक्त रामोशी समाजबांधवांना न्याय दिला नाही तर  सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रामोशी समाजबांधवांनी आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढे मार्गक्रमण करावे असे ते म्हणाले. 
Visits: 160 Today: 1 Total: 1916026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *