एकविरामुळे महिलांना उद्योग, व्यवसायासाठी मोठी संधी : डॉ.जयश्री थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
युवती व महिला यांना खुले व्यासपीठ मिळावे व त्या सक्षम व्हाव्यात यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन कार्यरत असून विविध उपक्रमामुळे महिलांच्या कल्पकतेला मोठा वाव मिळाला आहे. त्यांना आता उद्योग व व्यवसायासाठी मोठी संधी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी केले.

यशोधन कार्यालय येथे शिलाई मशीन प्रशिक्षणार्थी महिलांना डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले,  त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  शीला करंजेकर,  डॉ. नितीन भांड,  रामदास तांबडे, डॉ. विजय पवार,  शर्मिला हांडे, रवी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, महिलांमध्ये  जिद्द व चिकाटी आहे. फक्त त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने नवनवीन उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. आजच्या युगातील महिला या खऱ्या अर्थाने नवदुर्गा, कर्तुतवान व धाडसी आहेत. त्यांना पुढे जाण्यासाठी संधी मिळावी म्हणून  बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनची स्थापना झाली आहे. याचा फायदा अनेक महिलांना झाला आहे. महिलांनी आपल्या आयुष्यातील आवड व छंद वेळ देऊन जोपासले पाहिजेत. वेळेचे योग्य नियोजन केले तर हे नक्की शक्य होईल. शिलाई मशीन प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय, उपक्रम सुरू करावेत व स्वतःची एक नवी ओळख निर्माण करावी म्हणजे यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. तसेच सध्या नवरात्र उत्सव सुरू असून सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. यानिमित्त तालुक्यात  विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या ९० महिलांना  डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
महिला या शिक्षित होऊन संघटित व्हाव्यात, त्यांना रोजगाराची संधी मिळावी, त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी डॉ.जयश्री थोरात यांनी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली. यातून अनेक महिला व युवतींना प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणून आज शिलाई मशीन प्रशिक्षणार्थी महिलांनी डॉ. जयश्री थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला.
Visits: 221 Today: 4 Total: 1115341

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *