ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करा : माळवे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातून सावरणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलरचे प्रदेश सचिव विनायक शामसुंदर माळवे (जुन्नरकर) यांनी केली आहे.

याबाबत विनायक माळवे यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात उभी असणारी पिके नाहीशी झाली आहेत. अगोदरच शेतकरी कर्जबाजारी असताना त्यात ढगफुटीची भर पडल्याने त्याचे कंबरडे मोडले आहे. त्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून या संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ही जनता दल सेक्युलरचे प्रदेश सचिव विनायक शामसुंदर माळवे (जुन्नरकर) यांनी केली आहे.

Visits: 94 Today: 2 Total: 1106997
