तालुक्यातील जनता सुखी समाधानी राहू दे : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
गणपती बाप्पाचे सर्वांवर कृपाशीर्वाद कायम राहू द्या आणि या वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडला आहे, असाच पाऊस दर वर्षी पडत राहो आणि या मतदार संघातील सर्व सामान्य जनता सुखी, समृद्ध आणि त्यांना चांगले आरोग्य लाभो असे साकडे आमदार अमोल खताळ यांनी गणरायाच्या चरणी घातले.
शहरातील घुलेवाडी रोडवरील आ. अमोल खताळ यांच्या ‘साई हर्ष’ या निवासस्थानी आ. अमोल खताळ व त्यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या शुभहस्ते विधिवत  पूजा आरती करून गणरायाची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांचे वडील धोंडीबा खताळ,आई मंगल खताळ, भाऊ राहुल खताळ, भावजयी शितल खताळ यांच्यासह खताळ परिवार उपस्थित होता.
आ. खताळ म्हणाले की, संपूर्ण देशासह राज्यामध्ये सर्वत्र गणेश उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. याहीवर्षी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात केली आहे. हे गणराया तुमचे या मतदार संघातील सर्वच जनतेवर कृपा आशीर्वाद असू द्या आणि सर्वजण एकत्रित राहून गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी आ.अमोल खताळ यांनी केली आहे.
Visits: 151 Today: 1 Total: 1101696

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *