उपबाजार सुरु झालाय, परवाना घेवूनच व्यापार करा : तिकांडे

नायक वृत्तसेवा,अकोले
तालुक्यातील समशेरपूर (घोडसरवाडी)) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरु करण्यात आला असून भाजीपाला, फुले व फळे लिलाव चालू झाले आहेत. त्यामुळे समशेरपूर परिसरातील सर्व शेतकरी व व्यापारी वर्गाने समशेरपूर उपबाजारात आपला शेतीमालाची खरेदी,विक्री करावी असे आवाहन सभापती भानुदास तिकांडे यांनी केले आहे.

जे व्यापारी शेतमाल खरेदी विक्री व्यवहार करत असतील त्यांनी रितसर परवाना घेऊनच आपला व्यवसाय करावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी उपसभापती रोहिदास भोर व सर्व संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 114 Today: 1 Total: 1099007
