सिद्धेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील नांदूर शिंगोटे रस्त्यालगत असलेल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर प्रांगणात माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्या श्रावणी सोमवार निमित्ताने धार्मिक उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवगिरी महाराज आश्रमाचे महंत संदीपान महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.

तळेगाव दिघे येथील नांदूर शिंगोटे रस्त्यालगत असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर उत्सव सोहळ्यानिमित्त विधिवत महाभिषेक व पुजा अर्चा करण्यात आली. प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, माजी उपसभापती नामदेव दिघे, प्रभाकर कांदळकर, जनार्दन दिघे, तात्यासाहेब दिघे, उषाताई दिघे, तुकाराम दिघे, विठ्ठल दिघे, गणेश दिघे भास्कर दिघे, दत्तात्रय दिघे, रामदास दिघे, अमोल दिघे, अनिल दिघे, जालिंदर दिघे. नवनाथ महाराज दिघे, श्रीराम महाराज शिंदे, अभिजीत महाराज गिरी, बाबासाहेब गायकवाड, रामनाथ दिघे, अण्णासाहेब दिघे, सुनील दिघे, रविंद्र दिघे, शिवाजी दिघे, जगन दिघे, जीवन दिघे, ज्ञानेश्वर जाणेकर, कौस्तुभ दिघे, विजय दिघे तसेच पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

संदीपान महाराज भाविकांना उपदेश करतांना म्हणाले, प्रत्येकाने जीवनात भक्ती मार्गाचा अवलंब करावा. भगवंत भक्तीत जीवनाच्या उद्धाराचे सामर्थ्य आहे. भगवान शंकराचे वास्तव्य सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वांनी शिव आराधना करावी. सर्व जगाचा कर्ता करविता भगवान परमात्मा असून तो सर्वव्यापी आहे. भगवान परमात्मा तुमच्यात आहे. परमात्म्यापुढे कुणाचे काहीही चालत नाही. त्यामुळे जीवनात कुणीही अहंकार बाळगू नये, असेही ते म्हणाले.सदर धार्मिक सोहळ्यात हजारो भाविकांनी सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन युवक नेते अमोल दिघे यांनी केले. भाविकांच्या मांदियाळीत भक्तीमय वातावरणात सिद्धेश्वर महादेव मंदिर उत्सव सोहळा उत्साहात पार पडला.

