ढाकणे शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेत निवडी

नायक वृत्तसेवा, शेवगाव
येथील ढाकणे शैक्षणिक संकुलाच्या विविध शाखांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कष्ट, चिकाटी आणि गुणवत्ता यांच्या जोरावर विविध शासकीय पदांवर यशस्वी निवड मिळवून संस्थेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.

हिमांशू कबाडी,रोहन मुखेकर, स्नेहा वाघमारे आणि नरेंद्र लंगोटे या विद्यार्थ्यांची महावितरण मध्ये विद्युत सहाय्यकपदी निवड झाली असून ऋषिकेश चेमटे या विद्यार्थ्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी निवड झाली.तसेच भारत सरकार अखत्यारीत डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या ठिकाणी ऋषिकेश केदार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तसेच कॅम्पस इंटरव्हिवद्वारे २४२ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्र्टीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.ही निवड संस्थेतील शिक्षकांचे कुशल मार्गदर्शन, आधुनिक शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी विकासावर दिलेला भर यामुळेच शक्य झाली आहे.

ढाकणे शैक्षणिक संकुल गेल्या १५ वर्षांपासून तांत्रिक शिक्षण क्षेत्रात पॉलीटेक्नीक, इंजिनीरिंग, एमबीए, आय टि आय या शाखेतील हजारो विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवून कंपन्या तसेच शासकीय निमशासकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट करिअरच्या संधी उपलब्ध करून देत आहे. संस्थेचे हजारो विद्यार्थी आज स्वावलंबी झाले असून ग्रामीण दुष्काळी भागासाठी ढाकणे शैक्षणिक संकुल निरंतर काम करत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव जया राहणे, उपाध्यक्ष श्रीकांत ढाकणे,विश्वस्त हृषीकेश ढाकणे, प्राचार्य डॉ. अंबादास डोंगरे, प्रा. डॉ. आर. एच. अत्तार, प्रा. प्रवीण नागरगोजे, ट्रेनींग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड,प्रा.सुनील औताडे, प्रा. सचिन म्हस्के, प्रा. संतोष आंधळे,विभागप्रमुख प्रा. राजकुमार गुजर, प्रा. संकेत मोताळे, प्रा. विश्वास घुटे, प्रा. संदीप बोराळे,प्रा. अश्विनी गोरे, प्रा. संपदा उरणकर,इन्स्ट्रक्टर महेश खरड, प्रा. योगेश्वर शिरसाट यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी आहे. संस्थेचे ध्येय नेहमीच विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर समाजासाठी जबाबदार नागरिक घडविणे हे राहिले आहे. ही निवड शैक्षणिक आणि सामाजिक मूल्यांची पावती असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ ढाकणे यांनी सांगितले.

Visits: 146 Today: 2 Total: 1114832
