ध्रुव अकॅडेमीचा संघ ठरला योगासनांचा ‘चॅम्पियन’! जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा; राज्य स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघाचीही निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने जनरल चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट योगासनपटूंची आगामी कालावधीतील राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनने महाराष्ट्र योगासन स्पोटस असोसिएशनसह बृहंमहाराष्ट्र योग परिषदेच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन केले होते. संगमनेर येथील मालपाणी लॉन्सच्या प्रशस्त प्रांगणात पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 147 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

पारंपरिक योगासनाच्या सब ज्युनिअर गटात मुलींमध्ये तृप्ती डोंगरे, निरल वाडेकर व देवांशी वाकळे या स्पर्धकांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली, तर रिद्धी लगड व तनिष्का कट्यारे यांना चौथे व पाचवे स्थान मिळाले. याच वयोगटातील मुलांमध्ये प्रणव साहू याने सुवर्ण, आर्यन खरातने रौप्य व अंश मयेकरने कांस्य पदक मिळवले. नानक अभंग व शौर्य देशमुख या स्पर्धकांना चौथा व पाचवा क्रमांक मिळाला. याच प्रकारातील मुलींच्या ज्युनिअर गटात तन्वी रेडिजने सुवर्ण, रुद्राक्षी भावेने रौप्य तर मृणाली बाणाईतने कांस्य पदके मिळविली. स्वरा गुजरला चौथा तर अहमदनगरच्या गौरी गौडला पाचवा क्रमांक प्राप्त झाला.

मुलांच्या ज्युनिअर गटात प्रीत बोरकर, सुमीत बंडाळे व निबोध पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य तर, रुपेश सांगे याने चौथा आणि कोपरगावच्या विपूल वळवी याने पाचवा क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या सिनिअर गटात अंजली दरंगेने सुवर्ण, आयषा पठाणने रौप्य व अश्विनी कोळीने कांस्यपदक मिळवले, तर कोपरगावच्या करिष्मा हलवाईने चौथा व सुप्रिया गायकवाडने पाचवा क्रमांक प्राप्त केला. या प्रकारात मुलांमध्ये संगमनेरच्या वैष्णव कोरडे, दिपांशू सोलंकी व राहुल पटेल यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवली तर शेवगावच्या लक्ष्मण नलावडे व कोपरगावच्या प्रज्वल ढाकणे याने अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. सब ज्युनिअर गटातील कलात्मक प्रकारात संगमनेरच्या निरल वाडेकरने सुवर्ण, तृप्ती डोंगरेने रौप्य, देवांशी वाकळेने कांस्य आणि सिद्धी लगड व तनिष्का कट्यारे यांनी चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. मुलांच्या गटात अंश मयेकर, आर्यन खरात व प्रणव साहू यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य तर नानक अभंग याने चौथे आणि अकोल्याच्या सोहम नवले याने पाचवे स्थान पटकाविले. याच प्रकारात मुलींच्या ज्युनिअर गटात संगमनेरच्या रुद्राक्षी भावेने सुवर्ण, स्वरा गुजरने रौप्य तर मृणाली बाणाईतने कांस्यपदके मिळवली. गीता शिंदेला चौथ्या आणि कोपरगावच्या वैष्णवी ढाकणेला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या गटात निबोध पाटील, रुपेश सांगे व प्रीत बोरकर यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके मिळवली. सुमीत बंडाळेने चौथे तर कोपरगावच्या प्रसाद पुंडेने पाचवे स्थान प्राप्त केले.

मुलींच्या सिनिअर गटात कोपरगावच्या करिष्मा हलवाईने सुवर्णपदक प्राप्त केले तर मुलांच्या गटात संगमनेरच्या वैष्णव कोरडेने सुवर्ण, विपूल पांडोरे याने रौप्य आणि कोपरगावच्या प्रज्वल ढाकणे याने कांस्यपदक मिळवले. मुलींच्या कलात्मक सबज्युनिअर दुहेरी प्रकारात संगमनेरच्या तृप्ती डोंगरे व निरल वाडेकर या जोडीने सुवर्ण, अहमदनगरच्या ओवी सराफ व तनिष्का खांडरे यांनी रौप्य तर अहमदनगरच्याच रुचा जाधव व धनश्री हराळे यांच्या जोडीने कांस्यपदक मिळवले. मुलांच्या गटात संगमनेरच्या आर्यन खरात व प्रणव साहू यांच्या जोडीने सुवर्णपदक मिळवले. याच प्रकारातील मुलींच्या ज्युनिअर गटात संगमनेरच्या रुद्राक्षी भावे व तन्वी रेडिज यांनी सुवर्ण तर अहमदनगरच्या मुग्धा कुलकर्णी व गौरी गोड यांच्या जोडीने रौप्यपदक मिळवले.

मुलांच्या ज्युनिअर गटात निबोध पाटील व प्रीत बोरकर या जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. मुलांच्या सिनिअर गटात विष्णू चक्रवर्ती व वैष्णव कोरडे यांनी सुवर्ण तर कोपरगावच्या प्रज्वल ढाकणे व विशाल पांडोरे यांनी रौप्यपदक मिळवले. योगासनांच्या तालबद्ध दुहेरी प्रकारातही संगमनेरचे वर्चस्व राहिले. मुलींच्या सबज्युनिअर गटात देवांशी वाकळे व तृप्ती डोंगरे यांनी सुवर्ण तर रिद्धी आणि सिद्धी लगड या दोघा बहिणींच्या जोडीने रौप्यपदकांची कमाई केली. मुलांच्या गटात अंश मयेकर व नानक अभंग यांनी सुवर्णपदक मिळवले. याच प्रकारातील मुलींच्या ज्युनिअर गटात गीता शिंदे व स्वरा गुजर यांनी, मुलांच्या गटात रुपेश सांगे व सुमीत बंडाळे यांनी तर सिनिअर गटात दिपांशू सोळंकी व वैष्णव कोरडे यांनी सुवर्ण पदके मिळवित या स्पर्धेवर संगमनेरचा ठसा उमटविला. ठाण्याच्या राजेश पवार यांनी या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली. महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, राज्याच्या क्रीडा विभागाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे व जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष उमेश झोटींग यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पदकांचे वितरण करण्यात आले.
