अधार्मिक प्रवृत्तीमुळे धर्म संपवण्याचे काम सुरू : बाबा महाराज खामकर

नायक वृत्तसेवा, आश्वी
आपला धर्म संपवण्यासाठी इस्लाम आले नाहीत,शिख आले नाहीत,ख्रिचन आले नाहीत तर आपल्यातील अधार्मिक प्रवृत्तीमुळे आपला धर्म संपवण्याचे काम सुरू असल्याचे भागवताचार्य बाबा महाराज खामकर यांनी किर्तन सेवेतून सांगितले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे ३१ व्या जय हनुमान सप्ताह निमित्त किर्तन सेवेत मार्गदर्शन करतांना भागवताचार्य बाबा महाराज खामकर (खडकवाडी) बोलत होते. यंदा जय हनुमान सप्ताहाचे ३१ वर्ष असुन परीसरातील महिला,पुरूष तसेच युवक, युवती मोठ्या संख्येने या सप्ताहास उपस्थित होते.

खामकर महाराज म्हणाले, कुठल्या ही पुढाऱ्यांकडे जा, पण पुढील सप्ताहाच्या आधी मारूती मंदिरासमोर कायम स्वरूपाचा सभामंडप तयार करून घ्या असे आवाहन करत ते म्हणाले की,वारकारी संप्रदाय हा विज्ञाननिष्ठ संप्रदाय आहे. टाळी वाजवण्यामागे ही विज्ञान असुन टाळी वाजवल्यामुळे रक्तभिसरण प्रक्रिया वाढते. यामुळे हृदय रोगाचा धोका टाळु शकतो.दररोज सकाळ संध्याकाळी जर टाळी वाजून विठ्ठल नामाचा जप केल्यास वाढलेला बल्ड प्रेशर कमी होतो. याचा अभ्यास ही विज्ञानामुळेच उघड झाला आहे.

मुस्लीम समाजामध्ये हजरत पैगंबर यांनी पाच वेळा नमाज पठणासाठी सांगितले आहे. यात ही विज्ञान आहे. नमाजाच्यावेळी नमाज पठणात प्राणायाम रूपी व्यायाम घडून येतो.हिंदू,मुस्लीम धर्मामध्ये पुजा अर्चा करतांना धर्माबरोबर आरोग्याला ही महत्व विज्ञानमुळेच आधोरेखीत केले असल्याचे बाबा महाराज खामकर यांनी यावेळी सांगितले.

Visits: 127 Today: 1 Total: 1109642
