वाहतूक नियम जनजागृती! पोलीस उपनिरीक्षक भारती यांचे मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, अकोले
वाहतूक नियम जनजागृती निमित्त वसुंधरा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व सुरक्षितता या संदर्भात अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, दंड, कायदेशीर कारवाई, सुरक्षितता, वाहतुकीचे
नवीन नियम व सुधारणा याबद्दल सखोल माहिती दिली. ट्रॅफिक नियम म्हणजे रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठीचे नियम. या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून अपघात टाळता येतील व वाहतूक व्यवस्था व्यवस्थित राहील. त्याचबरोबर १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी वाहने चालवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले व सर्व संचालक मंडळाने शाळेत राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सोलापुरे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या वसुंधरा अकॅडेमीच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनी ‘रहदारीच्या नियमाची नव्हे ही सक्ती…ही तर सुरक्षित जीवनाची गुरुकिल्ली’ असा महत्त्वाचा संदेश उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी दिला.

Visits: 86 Today: 2 Total: 1111203
