लोकशाही व राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध रहावे ः आ.डॉ.तांबे अमृत उद्योग समूहाच्यावतीने 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्य सैनिकांनी मोठे योगदान दिलेले आहे. नागरिकांना समानतेबरोबर लोकशाही प्रणाली असलेल्या समृद्ध भारतीय राज्यघटनेचा जगात मोठा लौकिक असून ती जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध रहावे असे आवाहन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.

संगमनेरातील अमृत उद्योग समूहाच्यावतीने 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.विवेक धुमाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्यंकटेश, डॉ.बाबासाहेब लोंढे, डॉ.मनोज शिरभाते, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, जे.बी.शेट्टी, एस.टी.देशमुख, शीतल गायकवाड, उपप्राचार्य प्रा.अशोक मिश्रा, जी.बी.काळे, सीताराम वर्पे, नामदेव गायकवाड, प्रा.बाळासाहेब शिंदे, प्रा.सुनील सांगळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, भारत देश महासत्तेच्या दिशेने दमदार वाटचाल करत असून अनेक स्थित्यंतरे आली असती तरी ही भारतीय लोकशाही प्रणालीवर सर्वांचा दृढ विश्वास असल्याने ती अधिक मजबूत झाली आहे. अनेक भाषा, वेश, धर्म, प्रांत, वेगवेगळे असूनही सर्व भारतीयांचे मन मात्र एकच आहे सर्वांनी दाखवून दिले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळरानावर स्थापन केलेल्या येथील सहकाराने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लौकीक निर्माण केला आहे. मागील वर्षी कोरोना संकटाने जग थांबले. मात्र आता कोरोनानंतर सर्व पूर्वपदावर येत आहे. लसीचा शोध लावण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले असून आगामी काळात भारतीय तंत्रज्ञानाचा जगावर दबदबा राहील हे अत्यंत अभिमानास्पद आहे. मात्र या सर्व परिस्थितीत लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे असे आवाहन शेवटी केले. यावेळी सुरक्षा पथकाने शिस्तबद्ध संचलन करुन मानवंदना दिली. यावेळी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, एमबीए, डी-बी.फार्मसी, आयटीआय, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज या संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Visits: 184 Today: 4 Total: 1100443

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *