पडतानी परिवाराकडून रोटरी नेत्र रुग्णालयास 5 लाखांची मदत (स्व.) श्यामसुंदर (पोपटशेठ) पडतानी यांच्या तैलचित्राचेही अनावरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रोटरी क्लब अतंर्गत रोटरी नेत्र रुग्णालयाचे अहमदनगर जिल्ह्यात डोळ्यासंबंधीचे महत्वपूर्ण कार्य सुरु असते. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांत शिबिरे, मोतिबिंदूवर मोफत शस्त्रक्रिया, तिरळेपणावर मोफत शस्त्रक्रिया व डोळ्यांसंबंधीच्या विविध समस्यांवर इलाज केला जातो. रोटरी नेत्र रुग्णालयामार्फत आत्तापर्यंत 16 हजार 500 मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचे काम पाहून समाजातील दानशूर दाते रुग्णालयास स्वच्छेने आर्थिक मदत करीत असतात. यामध्ये संगमनेर येथील पडतानी परिवाराने अशीच भरीव आर्थिक मदत केली आहे. वडील (स्व.) श्यामसुंदर (पोपटशेठ) पडतानी यांच्या स्मरणार्थ उद्योजक विशाल पडतानी व परिवाराने 5 लाखांची भरीव मदत केली आहे.

दरम्यान, (स्व.) पोपटशेठही रोटरी क्लबचे सदस्य होते, आपल्या वडीलांनी जेथून सामाजिक कामाची सुरुवात केली त्या संस्थेस देणगी रुपाने मदत करण्याचा संकल्प विशल पडतानी यांनी केला होता. रोटरीच्या तिरळेपणा निर्मुलन मोफत शिबिराच्या निमित्ताने त्यांनी हा संकल्प पूर्ण केला. तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात यावेळी शैला पडतानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. याप्रसंगी (स्व.) पोपटशेठ यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांचा मुलगा विशाल पडतानी, स्वाती विशाल पडतानी, उद्योजक बंधू श्रीगोपाल पडतानी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी (स्व.) पोपटशेठ यांनी रोटरी क्लबसाठी केलेल्या विविध कामांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ते रोटरी क्लब संगमनेरचे माजी अध्यक्ष होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संगमनेर येथे अ‍ॅग्रो एक्स्पो आयोजित केला होता. पडतानी परिवाराने दिलेल्या या देणगीमुळे सर्व रोटरी सदस्यांना काम करण्यास आणखी बळ मिळेल, सर्व पडतानी परिवाराचे रोटरी क्लबतर्फे धन्यवाद, अशी प्रतिक्रिया रोटरी आय केअरचे अध्यक्ष संजय राठी यांनी दिली.

Visits: 12 Today: 1 Total: 118315

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *