बेग गँगचा फरार आरोपी गोरख जेधेला अटक

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कुविख्यात बेग गँगचा फरार आरोपी गोरख जेधे याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे. तत्पूर्वी मिटके यांनी धडाकेबाज कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवल्याने गुन्हेगारांनी धसका घेतला आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस पोलिसांत गुरनं. 359/2021 भादंवि कलम 307, 308, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील बेग गँगचा फरार आरोपी गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे हा वैजापूर येथे लपून बसला असल्याची बातमी खबर्‍यामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना मिळाली. या खात्रीशीर माहितीनुसार सूत्रे फिरवत तत्काळ आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदारांना आदेश दिले. त्यानंतर पथकाने वैजापूर येथे जाऊन एका हॉटेलमधून वैजापूर पोलिसांच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपी गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे यास शिताफीने अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, मोक्का, दंगल अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, उपनिरीक्षक अतुल बोरसे, पो. हे. कॉ. सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, सुनील दिघे आदिंनी केली आहे.

Visits: 79 Today: 1 Total: 1112893

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *