के.एम. हॉस्पिटलचे आज उद्घाटन!माजी मंत्री थोरात यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
१०० बेड्स, तज्ञ डॉक्टर्स आणि अत्याधुनिक सुविधाने परिपूर्ण असलेल्या के. एम. हॉस्पिटलचे आज बुधवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील पोफळे मळा, विठ्ठल मंदिरासमोर, बी.एड. कॉलेज नजीक के.एम. हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी एकाच छताखाली रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा माफक दरात मिळणार आहेत. आज बुधवारी सायंकाळी ४ वाजता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.डॉ.सुधीर तांबे असणार आहेत. यावेळी आ.सत्यजित तांबे, आ.अमोल खताळ, आ. डॉ. किरण लहामटे, उद्योगपती संजय मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, युनियन बँकेचे सुनीलकुमार यादव, वास्तु विशारद डॉ. महेंद्रदास वारेकर, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, डॉ. हर्षल तांबे, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, युनियन बँकेचे चीफ मॅनेजर संदीप पवार, इंजिनीयर गोपीनाथ म्हस्के, ॲड. श्रीकृष्ण गिते, प्रा.नामदेव बोरले, प्रभाकर मेहत्रे, नौसेना अधिकारी भानुदास घनकुटे, श्रीमती सुशीला शिंदे, श्रीमती रजनी वाव्हळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र म्हस्के, डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. सुशांत गिते, डॉ. सोनाली गिते, डॉ. संदीप बोरले, डॉ. कोमल बोरले, डॉ. बाळासाहेब मेहत्रे, डॉ. सुवर्णा मेहेत्रे, डॉ. अमित शिंदे, डॉ. रूपाली शिंदे, डॉ. सखाराम घनकुटे, मीनाक्षी घनकुटे, महेश वाव्हळ, कोमल वाव्हळ आदींनी केले आहे.

१०० बेड्स, तज्ञ डॉक्टर्स आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या के.एम. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा रुग्णांना माफक दरात मिळणार आहेत. या ठिकाणी हृदयवकार, समर्पित स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग, अपघात विभाग, मुत्र विकार, मधुमेह विकार, जनरल मेडिसिन, छातीचे विकार, पॅरालिसिस, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, गुडघा व खुबा, मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया, कॅथ लॅब, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस या सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Visits: 135 Today: 2 Total: 1106433
