अमृतवाहिनी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीची मिळाली संधी


नायक वृत्तसेवा, संगमनेर 
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध मानांकने मिळवलेल्या आणि नुकतेच ऑटोनॉमस झालेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील ऑटोमेशन अँड रोबोटिक्स या विभागातील पहिल्या बॅचच्या  विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य वेंकटेश म्हणाले की, अमृतवाहिनी संस्थेचा विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार यामुळे अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील विविध विभागांमधील विद्यार्थ्यांना नोकरीच्या थेट संधी मिळाल्या आहेत.औद्योगिकीकरणांमध्ये ४.० च्या बदलामुळे ऑटोमेशन व रोबोटिक्स या विभागाच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी असून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर महिंद्रा अँड महिंद्रा, जॉन्सन कंट्रोल ,आर्मस्ट्रॉंग डिमॅटिक, केएसबी आशिदा इलेक्ट्रॉनिक्स लीन ऑटोमेशन आयटेक रोबोटिक्स अँड ऑटोपेशन पायोनियर ऑटोमोशन या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

ऑटोमोशन अँड रोबोटिक विभागात मल्टी डिसिप्लनरी कौशल्य शिकवले जात असून यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स,इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर अशा सर्व विभागांचा समावेश असतो. ऑटोमेशन विभागात मानवी पद्धतीचा रोबोट, एबीबी औद्योगिक रोबोट,आर स्कार्डेल्टा रोबोट,ए आय बेस्ट स्काडा सेटअप थ्रीडी प्रिंटर इत्यादी अद्यावत रोबोटिक उपकरणामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य मिळते आहे.डॉ.विलास शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या वतीने प्रा. प्रवीण वाकचौरे आणि प्रा. प्रशांत वाकचौरे यांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना ४.२० पॅकेजवर नोकरीची संधी मिळाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ. एम.ए.व्यंकटेश, डॉ.विलास शिंदे, प्रा.विजय वाघे व ऑटोमेशन अँड रोबोटिक विभागातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
Visits: 107 Today: 2 Total: 1100055

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *