पोलीस अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

नायक वृत्तसेवा, झरेकाठी  
संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात नाशिक परिक्षेत्र विभागाच्या संकल्पनेतून व आश्वी पोलीस ठाण्याचा वतीने पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे  यांनी विद्यार्थ्यांना महिला व रस्ते सुरक्षा तसेच कायद्या विषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष ॲड.पोपट वाणी,गोरक्षनाथ वाणी,डॉ.भारत वाकचौरे,काशिनाथ चव्हाण,गोकुळ वाणी, शांताराम वाणी,विलास वाणी,सुदाम वाणी, पोलीस पाटील, पत्रकार सोमनाथ डोळे, ग्रामस्थ,पालक, मुख्याध्यापक प्रभाकर सांगळे,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर सेवक सहकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी व कपड्यांसाठी दीपक बर्डे  यांनी दोन हजार रुपयांचा निधी स्थानिक स्कूल कमिटीकडे सुपूर्द केला तसेच काही गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार  करण्यात आला.
Visits: 216 Today: 1 Total: 2168302

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *