वसुंधराच्या विद्यार्थ्यांनी मिळवले योगासन स्पर्धेत यश

नायक वृत्तसेवा,अकोले 
अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सहावी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व राज्य निवड चाचणी संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये  वसुंधरा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण यश संपादन केले.
या स्पर्धेत जिल्ह्यातून  दोनशेहून अधिक  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये वसुंधरा अकॅडमीचे ७ विद्यार्थी सहभागी झाले होते. 
ओवी शरद सातपुते हिला (आर्टिस्टिक योगा-सुवर्ण पदक, ट्रॅडिशनल बॅकबेंडिंग-रौप्य पदक), स्नेहल संजय शेटे या विद्यार्थिनीला (आर्टिस्टिक पियर मध्ये रौप्य आणि ट्रॅडिशनल ट्विस्टिंग प्रकारात कांस्य पदक),   काव्या विजय शेणकर (आर्टिस्ट्रिक पेअर ट्रॅडिशनल बॅकबेंडिंग -रौप्य पदक),  श्रेया धनराज वाकचौरे (फॉरवर्ड बेडिंग या प्रकारात रौप्य पदक, विहान मेहुल शहा-सुपाइन पोज योगा) या प्रकारात रौप्य पदक, ईश्वरी शरद सातपुते (ट्रॅडिशनल योगा) प्रकारात पाचवा क्रमांक, कार्तिकी ज्ञानदेव आरोटे सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले.
वसुंधरा अकॅडमीची कु.ओवी सातपुते हिने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून तिची राज्यस्तरीय पातळीवर निवड झाली आहे. ही  सर्व बक्षीसं मिळवून अकोले तालुक्याला  ‘2nd रनर अप’ होण्याचा बहुमान मिळवून  देण्यात  वसुंधरा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. वसुंधरा अकॅडमीच्या योग शिक्षिका वर्षा गोडे यांनी सर्व  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.  संस्थेचे संस्थापक मधुकर नवले, सचिव  विक्रम नवले, कॅम्पस  डायरेक्टर व वसुंधरा अकॅडेमीच्या प्राचार्या  डॉ.जयश्री देशमुख,  उपप्राचार्या राधिका नवले, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी. सर्व विभागांचे प्राचार्य व शिक्षक यांनी कौतुक केले.
Visits: 107 Today: 4 Total: 1106804

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *