जनतेच्या अडचणीचा निपटारा जागेवरच!  आ.खताळ  यांच्या कामाच्या पद्धतीने नागरिक खुश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध समस्या आमदार अमोल खताळ यांच्या समोर मांडल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक तक्रारीवर आमदार खताळ यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत उपाययोजना करून अनेक समस्या सोडविल्यामुळे आलेला प्रत्येक नागरिक जातांना समाधानी दिसत होता.
 पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आ. खताळ यांनी   शहरातील आपल्या जनसंपर्क कार्यालयात बसून जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.  रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यास दुपारी  ४ वाजले. प्रत्येक व्यक्तीस ५ ते १० मिनिटांचा वेळ देत आ. खताळ यांनी प्रत्येक अर्ज समजून घेत त्यावर उपाय योजना केल्या तर काही प्रकरणांमध्ये जागेवरच निर्णय घेऊन कार्यवाही  केली गेली. जनतेच्या प्रश्नांवर तत्पर प्रतिसाद देणाऱ्या आमदार खताळ यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांचे समाधान झाल्याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून आले.
भाऊ, आमची ही समस्या, अडचण आहे…असं म्हणत एकामागून एक नागरिक आपल्या समस्या मांडत होते. त्यावर तितक्याच तत्परतेने आमदार खताळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून कार्यवाही करत होते. सहा तासांच्या सलग उपस्थितीत आमदारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकारले व अनेक प्रश्न निकाली काढले.
Visits: 49 Today: 1 Total: 1098633

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *