‘छावा’ संघटनेच्या शाखेचे कोपरगावात उद्घाटन

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्व.अण्णासाहेब जावळे यांच्या आशीर्वादाने व अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या आदेशाने अखिल भारतीय छावा संघटनेच्या उत्तर नगर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नितीन पटारे व जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.29) कोपरगावात अकराव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

कोपरगाव येथील पुणतांबा फाटा व धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथे शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. धर्मवरी संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नितीन पटारे म्हणाले, ‘गाव तेथे शाखा’ अभियानांतर्गत उत्तर नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी 11 शाखांचे उद्घाटन करण्यात आले. ‘जिथे होईल अन्याय तेथे धाऊन जाऊ आम्ही…! जेथे होईल अंधार तेथे पेटून उठू आम्ही…!’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाबाबत समाजात जनजागृती करून लढा अधिक तीव्र करुन सरकारला जाब विचारण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष परिमल दवंगे, उपाध्यक्ष प्रशांत वाकचौरे, कार्याध्यक्ष नाना उगले, शहराध्यक्ष सागर सोमवंशी, उपशहराध्यक्ष महेश उगले, ग्राहक संरक्षक संतोष मोरे, वाहतूक सेनाप्रमुख संतोष भागिले आदी उपस्थित होते.

 

 

Visits: 288 Today: 2 Total: 1101914

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *