स्कूल बस फिटनेसचे ऑडिट करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करा : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
 शुक्रवार दि. ४ जुलै रोजी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात झालेल्या  स्कूलबस अपघात प्रकरणी जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी  विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. तसेच, संपूर्ण महाराष्टातील सर्व शाळांच्या  स्कूल बसचे फिटनेस ऑडिट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या सभागृहात मांडत या अपघातांना कारणीभूत ठरलेली शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे चंदनापुरी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
चंदनापुरी घाटात काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होते,त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळेच स्कूलबस पलटी होऊन अपघातात झाला होता. त्यात १६ विद्यार्थी जखमी झाले होते.  अपघातग्रस्त बसला परिवहन विभागाकडून परवानगी होती का? असा सवाल उपस्थित करत त्याची चौकशी करा,अशी स्पष्ट मागणी करत आमदार खताळ यांनी सर्व स्कूल बसचे फिटनेस ऑडिट तातडीने करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
Visits: 160 Today: 1 Total: 1793130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *